शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

धनदांडग्यांनी गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या शासनाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली तेजपृथ्वी ग्रुप करणार दूध का दूध पाणी का पाणी - अनिताताई खरात

धनदांडग्यांनी गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या शासनाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली तेजपृथ्वी ग्रुप करणार दूध का दूध पाणी का पाणी - अनिताताई खरात 

इंदापूर तालुका प्रतिनिधी शिवाजी पवार

इंदापूर तालुक्यात शिक्षणाचा मूलभूत अधिकार R T E अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनियमितता,भ्रष्टाचार दिसून येत आहे. त्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्याची सखोल चौकशी करावी. 
इंदापूर तालुक्यातील R T E साठी अनेक ॲडमिशन ही धनदांडग्यांची, श्रीमंताच्या मुलांची झालेली आहेत. गरिबांना मोफत शिक्षण देण्याच्या शासनाच्या उद्देशाला केराची टोपली दाखवली गेली आहे. आपल्या तालुक्यातील अनेक श्रीमंत पालकांनी आपल्या मुलाची ऍडमिशन RTE मधून मोफत व्हावी यासाठी इंदापूरच्या जवळपास राहणाऱ्या नातेवाईक, मित्र किंवा काही पैसे देऊन तात्पुरत्या स्वरूपाचे भाडेकरार करून त्यावरती प्रवेश घेतले आहेत. परंतु ते त्या ठिकाणी अजिबात राहत नाहीत. ते इंदापूर पासून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती आपल्या गावीच राहतात .तसेच काही महाभागाने तर भाडेकरार वेगळ्या ठिकाणचे व लोकेशन वेगळ्याच ठिकाणची दिली आहेत. ज्यांचे नंबर लागले आहेत व त्यांनी पूर्वी भाडेकरार केलेले नाहीत ते लोक आता भाडेकरार करत आहेत. नियमानुसार भाडेकरार प्रवेश घेण्याच्या अगोदरचा असला पाहिजे.ज्यांना खरी गरज आहे ते मात्र यापासून वंचीत राहिले आहेत, काहीनी आपल्या वशिल्याच्या जोरावर,काहीनी अधिकाऱ्यांना चिरी मिरी देऊन, काहींनी बनावट कागदपत्रे बनवून गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना यापासून वंचीत ठेवले आहे. या व इतर गोष्टीची चौकशी करून यावरती गटशिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी व याचा खरा लाभ गरजवंत विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा असे निवेदन आज तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी यांना दिले. यावेळी अनिता खरात म्हणाल्या की धनदांडग्यांच्या अशा खोटारड्या वृत्तीमुळे गोरगरिबांची मुले या योजनेपासून वंचित राहत आहेत धनदांडगे आपल्या ओळखीचा फायदा घेऊन किंवा इंदापूरच्या जवळपासच्या घरमालकांना अमिष दाखवून त्यांच्याकडून भाडेकरार करून घेऊन आपली मुलं या योजनेत बसवतात आणि गरीब मात्र यापासून वंचित राहतात . पालकांचा उद्रेक होण्याअगोदर शिक्षण खात्याने स्पॉट व्हिजिट करून या गोष्टीचा छडा लावावा व ज्यांनी कोणी अशी चुकीचे केले आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. 
यावेळी सद्दाम बागवान,विशाल म्हेत्रे संदीप रेडके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post