गुरुवीण देव दुजा, पाहता नाही त्रिलोकी', पाटोद्यात शिक्षकांची बदली झाल्याने विद्यार्थी भावनिक, सामाजिक कार्यकर्ते जगन जाधव.
धुळे जिल्हा प्रतिनिधी संकेत बागरेचा नेर
विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांचे नाते घट्ट असते.
विद्यार्थ्यांचा अधिक वेळ शिक्षकांच्या सहभासातच जातो.
त्यामुळे शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जिव्हाळा निर्माण होतो.
मंठा तालुक्यातील पाटोदा येथील जिल्हा परिषद शाळेतील
शिक्षक श्री पांगरकर सर यांची जालना तालुक्यातील उठवद येथे जिल्हा परिषद श्री चैतन्य पुरी विद्यालयात बदली झाल्याने त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना गहिवरून आले.
दहा वर्षे यशस्वी अध्यापन केल्याने त्यांचा यथोचित सन्मान शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी श्री.पांगरकर यांनी आपल्या मनोगत सांगितले की विद्यार्थी हे सुगंधित फुलासारखी असतात जी आपल्या कर्तुत्वाने आपली शाळा, आपले गाव, आपले आई-वडील यांचे नाव समाज जीवनामध्ये सुगंधित करतात.
२०१४ ते २०२५ या अकरा वर्ष कालखंडात पाटोदा या गावांमध्ये अध्यापनाचे कार्य करीत असतांना माझा विद्यार्थी भविष्यामध्ये कसा समृद्ध होत जाईल याचे ज्ञान देत गेलो आणि आज ज्यावेळेस निरोप समारंभाची वेळ आली त्यावेळेस अकरा वर्षातील हे विद्यार्थी म्हणजे माझ्या शाळेतील गोड फळे होय. निश्चितच भावी जीवनामध्ये माझे विद्यार्थी हे नेहमी शाळेसाठी आदर्शच राहतील व पुढील अनेक पिढ्याला सशक्त बनवण्यासाठी आपल्या पूजनीय अशा शाळेच्या विकासासाठी मदत करतील. निश्चितच विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड एक कुंडी शाळेला भेट द्यावी ही सुद्धा एक आशा ठेवतोअसे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.
याप्रसंगी शिक्षक वर्ग.पांगारकर सर. चव्हाण सर . यामुलवाड सर. टोगरे सर.राऊत सर.वानुळे सर.कांकुटे मॅडम.टोगरे मॅडम. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक.पारसकर सर . सर्व शिक्षक वृंदासह शाळेचे आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment