विषय : महिला अत्याचार आणि सुरक्षे बाबत
महिदय :- पेण मधील पॉस्को गुन्ह्या अंतर्गत अटक झालेल्या मनीष नरेंद्र म्हात्रे पेण आणि पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे, अशा वारंवार होणाऱ्या अत्याचारात माता भगिनी नाहक शिकार होत आहेत , राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही अशी शंका सामान्य जनतेच्या मनात येत आहे , या आधी उरण , बदलापूर अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात गुन्हेगारांना अधिकृत शासन अजूनही झाले नाही ,आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवेदनाद्वारे गुन्हेगार कितीही मोठा राजकीय वरदहस्त असलेला का असेना त्याला शिक्षा झालीच पाहिजे , पेण मधील गुन्हा तर अल्पवयीन मुलीवर झाला आहे , प्रेमाची खोटी आश्वासने देऊन फक्त शरीरसुखासाठी आज हे असे नीच वृत्तीचे तरुण मुलींचे आयुष्य बरबाद करत आहेत , तरी या प्रकरणी कुठलीही तमा न बाळगता सखोल चौकशी होऊन दोषी व्यक्तीस कठोर शिक्षा व्हावी , कारण हा एकच पर्याय आता असे कृत्य करणाऱ्या दुसऱ्या गुन्हेगाराच्या मनात खाकी ची धाक वाढवू शकतो ..
तरी समस्त जनतेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वतीने ही मागणी आहे , लवकरात लवकर दोषी व्यक्तींवर कारवाई व्हावी यासंबधित पेण पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यात आले. यासाठी श्रीम दीपश्री पोटफोडे, दर्शना जवके, महानंदा तांडेल, मेघना चव्हाण, वैशाली समेळ, स्मृती म्हात्रे, छाया बामणे,मोहिनी गोरे, सुधाकर म्हात्रे, सुहास पाटिल, समीर म्हात्रे,हिराजी चोगले,नंदू मोकल, गजानन मोकल,विजय पाटिल, योगेश पाटिल, ,विनोद म्हात्रे,समीर साठी,नामदेव पिंगलस्कर, राकेश पाटिल,तुकाराम म्हात्रे हे उपस्थित होते
Post a Comment