शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शक्तीपीठ महामार्ग शेतकरी आंदोलनाचे नेते श्री गिरीश फोंडेचे निलंबन मागे घ्या.

शक्तीपीठ महामार्ग शेतकरी आंदोलनाचे नेते श्री गिरीश फोंडेचे निलंबन मागे घ्या.
प्रतिनिधी संजय गायकवाड
आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच अखिल भारतीय किसान सभेचा स्थापना दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले तसेच क्रांतीसिंह नाना पाटील यांना क्रांतिकारी अभिवादन. तसेच केंद्र सरकारने लादलेले तीन शेतकरी विरोधी अन्यायकारक कायदे विरोधात आंदोलनात शहीद झालेल्या 700 शहीद शेतकऱ्यांना अभिवादन.
शासन प्रशासन निर्देशनाने शक्तीपीठ शेतकरी आंदोलनाचे नेते व किसान सभेचे राज्यसचिव श्री गिरीश फोंडे यांचे शिक्षक सेवेतून निलंबन केले. सदर निलंबन न्याय पूर्ण नाही. भारतीय संविधानातील मूलभूत व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण आणणारे आहे. नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग करिता संपादित करीत असलेली जमीन, सिंचनाखाली जमीन लाखो कुटुंबांचे भरण पोषण करणारी भूमी आहे. सदर महामार्गामुळे लाखो कुटुंब बेघर ,निराधार , भूमीहीन होतील. त्यांच्या उपजीविकेचे साधन हीसकावून घेतले जाणार आहे. या प्रकल्पाला प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा शंभर टक्के विरोध आहे. विशेष भूसंपादन कायदा 2013 चा आधार घेतला तर सदर प्रकल्प होणेच नाही. 
म्हणून सदर श्री गिरीश फोंडे यांचे निलंबन विनाविलंब मागे घ्यावे. तसेच सदर विलंबन मागे न घेतल्यास महाराष्ट्रामध्ये न्यायपूर्ण दृष्टिकोन असलेल्या सर्व शक्तींना सोबत घेऊन आंदोलन तीव्र करू. कारण जनसुरक्षा नावाखाली येऊ घातलेला कायद्याची ही जणू चुणूकच आहे. हा कायदा लागू झाला तर यापुढे महाराष्ट्र व देशात कुठलेही आंदोलन करणे म्हणजे सरकारने कारण ना देता आंदोलकांना जेलमध्ये पाठवण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होईल. सरकार प्रशासनाने नागरिकांप्रती संवेदनशील राहावे आणि म्हणूनच मुख्यमंत्री ,महाराष्ट्र शासन यांना पेण,तहसीलदार मार्फत पत्र देण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे ,चंद्रकांत म्हात्रे सर ,जनार्दन म्हात्रे ,नाईक, पाटील, डॉ .प्रा. गोरे सर इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post