शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

स्वातंत्र्य सेनानी स्मारक संपूर्ण नूतनीकरण ,आणि तहसील कार्यालयातील अधिकृत स्वातंत्र्य सेनानीचे नावे स्तंभावर स्थापित करून सन्मान द्यावा.

स्वातंत्र्य सेनानी स्मारक संपूर्ण नूतनीकरण ,आणि तहसील कार्यालयातील अधिकृत स्वातंत्र्य सेनानीचे नावे स्तंभावर स्थापित करून सन्मान द्यावा.
 रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड

आपल्याला स्वातंत्र्य मिळून कित्येक दशके उलटली,त्यांचे योगदान मोठे होते.त्यांचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे.प्रशासनाने त्यांचा सन्मान ठेवण्याकरिता ही पवित्र वास्तू प्रत्येकठिकाणी उभारली आहे. अशेच स्मारक आपल्या पवित्र नगरीत महात्मा गांधी वाचनालय,आणि बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आहे. त्याचे पवित्र राखणे प्रशासन,आणि नागरिकांचे कर्तव्य आहे...मात्र आत्ताच्या घडीला येथील परिसर फेरीवाले,खाजगी खाऊची दुकाने,राजकीय पक्ष,संघटना,संस्था,विविध जाहिराती.वाढदिवसाचे शुभचिंतन यांचे बॅनर लाऊन पूर्ण विद्रुपीकरण झाले आहे.मात्र नगरपरिषदे मार्फत कठोर कारवाई का केली जात नाही हे न समजणारे कोडे आहे.
तरी या संपूर्ण वास्तूचे नूतनीकरण केले करून
ताम्र पट धारक शासन नोंदणीकृत ,दिग्गज सेनानीची नावे दिसून येत नाही .ती नावे स्थापित करण्यात यावी..
अनधिकृत फेरीवाले,विक्रेते,विविध विषयासंदर्भातील बॅनर बाजीला मज्जाव करणे, नो पार्किंग झोन,जाहीर करणे,अतिक्रण विरोधी पथकाकडून योग्य ती कारवाई करीन हा परिसर स्वच्छ,आणि मनमोहन ठेऊन पवित्र राखावे यासाठी आज दिनांक ०९/०४/२०२५ रोजी माननीय पोलिस प्रशासन माननीय,तहसीलदार पेण,नगरपरिषद यांना माझ पेण तर्फे निवेदन देण्यात आले..
सर्व पत्रकार बंधू,सामाजिक संस्था,संघटना,प्रसार माध्यमे,व्यक्तिगत प्रयत्न करण्यात आले मात्र नगरपरिषदे मार्फत पाहिजे तेव्हढे पर्यंत झाले नाहीत.म्हणून नवीन ऊर्जा देण्यासाठी आज निवेदन दिले गेले.
तहसील मधील नोंदी नुसार सुमारे २५ स्वातंत्र्य सेनानीची नावे स्थापित होणे बाकी आहे.ती नावे स्थापित झाल्यावर 
खरेखुरे ऋण फेडले जाईल. असे वाटते.

राजेंद्र पाटील,गणेश तांडेल,सूरज,आप्पा सत्वे ' अभिमन्यू म्हात्रे सी .आर म्हात्रे . पिंगळे सर ' गणेश कोळी सर आर .एन पाटील

Post a Comment

Previous Post Next Post