कळंब येथे आमदार केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन
*राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५७ चाळ कळंब येथे स्पर्धेचे आयोजन*
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
प्रसिद्ध युवा उद्योजक राहूल (बापू) अर्जुन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी इंदापूर तालुक्यातील कळंब ५७ चाळ येथे आमदार केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
हा चित्त थरारक अनुभव पाहण्याची संधी दवडता कामा नयेअसे आवाहन करण्यात आले आहे.
प्रथम बक्षीस ७१ हजार रुपयांचे, दुसरे बक्षीस ५१ हजार रुपयांचे, तिसरे बक्षीस ३१ हजार रुपयांचे ,चौथे २१ हजार रुपयांचे, पाचवे ११ हजार रुपयांचे, सहावे ७ हजार रुपयांचे आणि अंतिम ५ हजार रुपयांचे असणार आहेत.
विजेत्यांना गदा, ढाल आणि ट्रॉफी मिळणार आहेत.
मैदानी बैलगाडा शर्यत ही अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य नियमानुसार होईल.
स्पर्धकांनी नियम व अटी प्रमाणे चालावे अन्यथा स्पर्धक स्पर्धेतून बाद केले जातील हे लक्षात घ्यावे.
स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी
१ एप्रिल २०२५ ते १२ एप्रिल २०२५ दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहील याची नोंद घ्यावी.
१२ एप्रिल २०२५ रोजी सायं ६.०० वा. लॉट ऑनलाईन पद्धतीने केली जातील.
ऑनलाईन पद्धतीनेसुद्धा नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले गेले आहे.
यासाठी पुढील भ्रमणध्वनी क्रमांक अमोल चव्हाण - ९५११२४०५८४, सचिन कदम - ९६८९६६३८१०, सागर पाटील - ८३२९९१७८७८,
सोमनाथ जमदाडे -७०८३७९७३७३ संपर्क साधावा असे आवाहन आयोजक राहुल (बापू)पाटील यांच्याकडून करण्यात आले.
Post a Comment