शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

माणगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव हर्षोल्लासात साजरा

        उत्तम तांबे 
                   रायगड जिल्हा संपादक 
          बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र . - १ , माणगाव विभाग 24 गाव ग्रुप यांच्या विद्यमाने १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न - बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माणगाव येथे विश्वरत्न , बोधिसत्व - डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला . सकाळी दहा वाजता ज्येष्ठ समाजसेवक - राजाराम हाटे व अरुण मोरे यांच्या शुभहस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले .                   
        त्यानंतर धम्म उपासक - सूर्यकांत कासे यांनी सामुदायिक धम्मवंदना व बुद्ध वंदना घेतली . जाहीर अभिवादन सभेनंतर सुप्रसिद्ध कवी गायक - संकेत कांबळे आणि पार्टी यांचा भीम गीतांचा बहारदार व प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला . अल्पोउपहारानंतर सायंकाळी क्रांतीसुर्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यप्रतिमेची माणगाव शहरातून बँजोपार्टी , डीजेसह फटाक्यांच्या आतेशबाजीमध्ये धुमधडाक्यात भव्य -दिव्य मिरवणूक काढण्यात आली . या कार्यक्रमाच्या ठिकाणी भारतरत्न - डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा एक क्रांतिकारी लढा म्हणजेच बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा देखावा उभारण्यात आला होता .
                सदर कार्यक्रमाचे नियोजन माणगाव तालुका अध्यक्ष - रवींद्र मोरे , शाखा क्र . १ अध्यक्ष - प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते . सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी - महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे , माणगाव नगरपंचायत नगराध्यक्षा - शर्मिला सुर्वे , राष्ट्रीय काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष - सुभाष केकाणे ' माजी समाज कल्याण सभापती - अशोक गायकवाड वंचित बहुजन आघाडी माणगाव तालुका अध्यक्ष - रोहन साळवी , गट शिक्षणाधिकारी - सुरेखा तांबट मॅडम , माजी नगराध्यक्ष - आनंद शेठ यादव व माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव , नगरसेवक - कपिल गायकवाड राजेश मेहता , संदीप खरंगटे , सुनील पवार युवा नेते - निलेश थोरे , अल्ताफ धनसे , नूरखान पठाण , माजी जिल्हाचिटणीस - कीर्तिराज शिर्के     
  
          मुख्याधिकारी - संतोष माळी , विभागीय पोलीस अधिकारी - पुष्कराज सूर्यवंशी , पोलीस निरीक्षक -निवृत्ती बोराडे , सुरेश मोहिते , नगरसेविका - माधुरी मोरे , हर्षदा काळे ,सिम्बॉल ऑफ नॉलेज अध्यक्ष - सुशील कासारे , किरण कांबळे ,तालुका चिटणीस - आर . डी . साळवी ,सहचिटणीस - रणजीत मोहिते ' ॲड . नरेश जाधव , उत्तम तांबे , सूर्यकांत कासे - पराग जाधव , निलेश साळवी , विवेक जाधव , सुनील मोरे , अरुण सोनवणे ,आत्माराम घुगरे , अरविंद मोरे , दयाराम साळवी , विनोद मोरे , उमाजी साळवी ,प्रकाश मोरे , रुपेश जाधव , अनिल गमरे ' विनोद हाटे , राजेंद्र मोरे , विकास शिर्के , प्रमोद मोरे ,  किशोर जाधव या मान्यवरांसह आंबेडकर प्रेमी जनसमुदाय बहुसंख्येने उपस्थित होता .

Post a Comment

Previous Post Next Post