शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

ईडा पीडा टळो आणि एकदाचं हेटवणे धरणातून सिंचनाच पाणी मिळो

ईडा पीडा टळो आणि एकदाचं हेटवणे धरणातून सिंचनाच पाणी मिळो 
 रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड 
खारे पाट विकास संकल्प संघटना यांच्या माध्यमातून वाशी येथे दोन वेळा आमरण उपोषण झाले...यातून 
एकदा श्रद्धांजली वाहून मेणबत्ती चे प्रकाश सरकार पर्यंत पोहचले..उपोषण थांबले..मात्र फलित लवकर मिळत नाही हे पाहून दुसरे आमरण उपोषण करावे लागले. अगदी लोकसभा लागणार त्या अगोदर, खारे पाट ग्रुप ची तरुणाई हुशार,त्यांनी चक्क गाढवाचे लग्न लावले..आणि पुन्हा एकदा सरकारला या गंभीर आणि लोकपयोगी प्रश्नाचा विचार करावा लागला..
यावेळी मात्र आत्ताचे खासदार सुनिल तटकरे साहेब वाशी येथे येऊन तरुणाईची चिकाटी,पाहून डायरेक्ट फडणवीस साहेब यांच्या बरोबर उपोषण कर्ते यांच्याशी फोन वरून चर्चा घडवून आणली आणि वचन मिळवून दिले सिंचनाची सोय होऊन तुम्हा लाडक्या बहिणीच्या डोक्यावरून हंडा उतरविला आणि वचन दिले.काम होईल उपोषण मागे घ्या..कारण सर्वांची काळजी वाटत होती.त्यांचा मान ठेऊन एका उपोषण कर्त्याने उपोषण सोडले मात्र एक टीम मुंबई येथे गोऱ्हे मॅडम यांच्या बरोबर बैठक करत होते..एकदम भारी दिवस त्यात यश मिळाले...
हा मोठा संदेश घेऊन आमची टीम मुंबई वरून परतली आणि एकदाचे उपोषण थांबले..
यश खास कारण लोकसभेची आचार संहिता लागण्या अगोदर ७६६ कोटी रुपयांची मंजुरीचे पत्र तटकरे साहेबांनी मिडिया समोर वाचून दाखविले..एव्हढेच नव्हे तर दयानंद भगत यांनी ते पत्र उपोषण कर्त्यांच्या हातात सुपूर्त केले..याला म्हणतात दिलेला शब्द खरा करणे.
मात्र साहेब खासदार झाले...भरघोस मतांनी.. विभागातून भरघोस मते मिळाली.
नंतर विधान सभा झाली नवीन सरकार आले. वर्ष झाले तरीही कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली,निविदा उघडण्यात आली असून सुद्धा कार्यारंभ आदेश कधी सुरू होईल याची चातक पक्षी जसा वाट पहातोय तशी वाट पाण्याची पाहत आहे येथील जनता...लाडक्या बहिणी.....
वेळोवेळी अधिकाऱ्यांबरोबर संपर्क करणारे कार्यकर्ते आहेत...नेते लोकप्रतिनिधी पाहिजे तसा सहकार्य करत आहे असे चित्र दिसत नाही.
आत्ता या दोन महिन्यात शक्यता कमी कारण पाऊस.. वाहतूक समस्या, नेहमीचाच अनुभव..वास्तविक प्रशासनाने मनावर घेऊन ही तडफड थांबवावी...मायबाप सरकार .याकडे लक्ष देतील यासाठी दिनांक ११/०४/२०२५ रोजी माननीय खासदार तटकरे साहेब यांच्या बरोबर चर्चा करून काय अडथळा आहे.हे जाणून घेतले साहेबांनी माझे काम.मी हे सर्व केलेले असताना विलंब नको तातडीने त्रुटी पूर्ण करा आणि कार्यारंभाचा आदेश द्या असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
शेवटी जो जे काम करतो त्याला ते पूर्णत्वास गेल्यावर खरे समाधान लाभते...साहेबांनी मनावर घेतले आहे ते पूर्ण व्हावे. आणि जगदंबा माते चरणी शुभारंभाचा नारळ फोडावे.
ज्यांनी १५ दिवस अन्न त्याग करून स्वतःला त्रास दिला त्याचे समाधान,त्यांची स्वप्न पूर्ती, समस्थ नागरिक,संघटना,सर्वस्वी मदत करणारे लोकप्रतिनिधी यांना सुद्धा हायसे वाटेल.

Post a Comment

Previous Post Next Post