खोपोली , कर्जत आणि उरण नगरपरिषद कंत्राटी कामगारांचे होणारे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी अलिबाग येथे आमरण उपोषण
( माणगाव - उत्तम तांबे , रायगड जिल्हा संपादक )
खोपोली , कर्जत आणि उरण नगरपरिषद कंत्राटी कामगारांचे होणारे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी दिनांक 22 एप्रिल 2025 पासून कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे आमरण उपोषण चालू आहे . गेले पंधरा ते वीस वर्षापासून नगर परिषदेमध्ये कंत्राटी सफाई कामगार अतिशय प्रामाणिकपणे शहराची साफसफाई करीत आहेत . स्वतःचा जीव धोक्यात टाकून नगरवासीयांचे आरोग्य जपण्याचे अनमोल कामकाज करत आहेत .विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या वेळी हा कामगार जर कार्यरत नसता तर नागरिकांना जगणे अशक्य झाले असते , तेव्हा हा कामगार स्वच्छता दूत होता . देशभर ताठ चमचे घेऊन घंटानाद करणाऱ्या याच कामगारांना कोरोना योद्धा म्हणूनसंबोधले जात होते . पण आज याच कामगारांना कायद्याने बंधनकारक असलेले किमान वेतन , भविष्य निर्वाह निधी , इ . एस . आय . सी . या आरोग्य योजनेचा लाभ दिला जात नाही . ह्या कामगारांचे शोषण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने नियोजित कराराचे उल्लंघन केले आहे . त्या करीता मा .मुख्याधिकारी यांनी संबंधित कंपनीवर कारवाई करणे अपेक्षित आहे .ठेकेदार कंपनीवर कारवाई होण्याबाबत - मा. आयुक्त तथा संचालक यांचे दिनांक 26 ऑगस्ट 2024 च्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने या संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करणे बाबतचे लेखी आदेश दिलेले आहेत जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही 'तसेच कंत्राटी सफाई कामगारांना न्याय मिळत नाही , तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असे सदर आमरण उपोषणाच्या लढायचे कामगार नेते - अनिल जाधव व संतोष पवार यांनी पत्रकारांना विशेष माहिती दिली .
Post a Comment