मुंबई येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला उसळला भीमसागर
( माणगाव - उत्तम तांबे , रायगड जिल्हा संपादक )
बौद्धजन पंचायत समिती मुंबई सभापती सर सेनानी - आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 5 एप्रिल 2025 रोजी महान सम्राट अशोकराजा यांच्या जयंतीदिनी मुंबई येथील राणीबाग भायखळा ते आझाद मैदान याठीकाणी बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते . या महामोर्चात महाराष्ट्रामधील कानाकोपऱ्यातून भीमबांधव , भीमअनुयायी मुस्लिम बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते . याठिकाणी हक्क आणि न्यायासाठी भीमसागर उसळला होता . तथागत गौतम बुद्धांचा विजय असो , विश्वरत्न - डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो , बोधगया मंदिर कायदा -1949 रद्द करा , कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय , आनंदराज आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है , बोधगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे , नाही कोणाच्या बापाचे बोधगया महाविहार आमच्या हक्काचे ' असे या महामोर्चात भीमसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्या . या मोर्चाला आंतरराष्ट्रीय मोर्चेचे स्वरूप आले होते . समता सैनिक दलाने जबाबदारी पूर्वक या महामोर्चाचे नियंत्रण केले , मात्र पोलीस प्रशासनाचे सदर मोर्चेस योग्य सहकार्य न मिळाल्याने आनंदराज आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला . सदर मोर्चा सभेत समता सैनिक दलाचे सरसेनानी - भीमराव आंबेडकर , भन्ते शांतीरत्न ,भन्ते सुसाई लामा , रियाज मुकादम , बौद्धजन पंचायत समिती सभापती सरसेनानी - आनंदराज आंबेडकर ,उपसभापती - विनोद मोरे , कार्याध्यक्ष - लक्ष्मण भगत , उपकार्याध्यक्ष - अशोक कांबळे , एच . आर . पवार , सरचिटणीस - राजेश घाडगे यांनी या मान्यवरांनी मोर्चेस संबोधित केले . बोधगया मंदिर कायदा - 1949 रद्द झाला पाहिजे याबाबत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पत्र देण्यात आले आहे अशी माहितीही आंबेडकरांनी दिली . आमची अस्मिता , आमचे श्रद्धास्थान असलेले बोधगया महाबोधी महाविहार येथे 132 वर्षापासून ब्राह्मणांनी वर्चस्व गाजविले आहे . हे महाविहार आमच्या हक्काचे आहे .भारतरत्न - डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे 26 जानेवारी 1950 साली सर्व जुने कायदे रद्द झाले आहेत . त्यामुळे बोधगया मंदिर कायदा ॲक्ट 1949 हा पण रद्द झाला पाहिजे . मंदिरावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ह्या सरकारने हा कायदा तसाच ठेवला आहे . त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो .बोधगया महाविहार हे आमचे तीर्थस्थान आहे . त्यावर आमचा हक्क व अधिकार आहे आणि ते आम्हाला मिळालेच पाहिजे . असे सरसेनानी सभापती - आनंदराज आंबेडकर यांनी प्रमुख मागणी यावेळी व्यक्त केली .
Post a Comment