माणगावच्या सुरक्षेबाबत विविध संघटनेसोबत चर्चा उपसंपादक कॅप्टन एन. एस. रंधावा
दिनांक 10 मे 2025 रोजी माणगाव पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती बोराडे साहेब यांची वीर यशवंतराव घाडगे माजी सैनिक संस्था अध्यक्ष श्री सहदेव खैरे, सचिव ऋषिकेश शिंदे, चारिझेन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधवा साहेब यांच्याजवळ माणगावच्या सुरक्षेविषयी विविध संस्थांमार्फत सहकार्य कसे लाभेल. याविषयी चर्चा करण्यात आली.
त्यावेळी पत्रकार बांधव, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, माजी सैनिक यांनी माणगाव मध्ये सुरक्षा सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही आपणास सहकार्य करू. असे सांगितले.
तरी माणगांव मधील तमाम वाशीयांना कळवण्यात येते की, सुरक्षा विषयी कोणतीही माहिती द्यावयाची असल्यास संबंधित पोलीस ठाण्यात
निसंकोचपणे द्यावी. अशी विनंती केली जात आहे.
Post a Comment