शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सैनिकांचा आत्मविश्वास व मनोबल बळकट करण्यासाठी इंदापुरात तिरंगा रॅलीचे आयोजन

सैनिकांचा आत्मविश्वास व मनोबल बळकट करण्यासाठी इंदापुरात तिरंगा रॅलीचे आयोजन

  शिवाजी पवार इंदापूर प्रतिनिधी

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने दहशतवादावर केलेल्या हल्ल्यामधील सैनिकाच्या समर्थनार्थ व सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्याच्या उद्देशाने इंदापूर येथे तिरंगा रॅली काढण्यात आली.यावेळी वीरपत्नी, वीरमाता व सेवानिवृत्त जवान यांचा सन्मान करीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


   शिवसेना इंदापूर तालुक्याच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने रविवार दिनांक11 मे रोजी मातृदिनाचे औचित्य साधून तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री. इंद्रेश्वर मंदिरात जय हिंद माजी सैनिक सेना यांच्या हस्ते पूजा करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्वातंत्र्य सैनिक स्मृतीस्तंभ येथे रॅलीचा समरोप करण्यात आला.

यानिमित्ताने भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक, वीरपत्नी व वीरमाता यांचा सन्मान करण्यात आला तसेच शहिद बांधवांना श्रध्दांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सिमा कल्याणकर, शिवसेना शहर प्रमुख अँड आनंद केकाण,उपशहरप्रमुख शाबूद्दिन सय्यद ‌तालुका प्रमुख राधिका जगताप, सोमनाथ लांडगे यांनी प्रयत्न केले.तर मेजर कैलास गवळी, धरमचंद लोढा,हमीद अत्तार, प्रशांत सिताप, सिने अभिनेते शिवकुमार गुणवरे, अशोक ननवरे, महादेव चव्हाण सर, प्राप्तेश बर्गे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सैनिकांचा आत्मविश्वास व मनोबल बळकट करण्यासाठी तिरंगा रॅली..
भारत माता की जय, जय जवान, जय किसान जोरदार घोषणाबाजी करीत देशाच्या सीमेवर आपले सैनिक दिवस रात्र डोळ्यात तेल घालून भारत मातेचे व आपले रक्षण करीत आहेत.त्याचा आत्मविश्वास व मनोबल बळकट करण्यासाठी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती.

Post a Comment

Previous Post Next Post