शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

खोपोली पोलिसांची अत्यंत अभिमानस्पद व उल्लेखनीय कामगिरी सी .ई..आय.आर. तपास कार्यप्रणाली द्वारे गहाळ झालेले अँन्ड्रॉइड मोबाईल हस्तगत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मा. आचल दलाल यांच्या हस्ते सदर मोबाईल मालकांना सुपुर्द

            
         बोरघर / माणगाव
                      उत्तम तांबे 
          रायगड जिल्हा संपादक 
   खोपोली पोलीस ठाणे हद्यीतील गहाळ झालेल्या एन्ड्रॉईड मोबाईल पैकी एकुण 8,96,000/- रुपये किमतीचे एकुण 48 ॲन्ड्रॉईड मोबाईल सी.ई.आय. आर. या कार्यप्रणालीच्या माध्यमातुन हस्तगत करण्यात आलेले आहेत. 
    खोपोली पोलीस ठाणेच्या कार्य क्षेत्रातील सन 2025 सालात नागरीकांच्या गहाळ झालेल्या एन्ड्रॉईड मोबाईल पैकी सी.ई.आय.आर. या माध्यमातुन जवळपास एकुण 48 एन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले असुन त्याची एकुण किंमत 8,96,000/- रुपये इतकी आहे. सदरचे मिळुन आलेले एन्ड्रॉईड मोबाईल हे आज दिनांक 25.06.2025 रोजी मा.श्रीमती आँचल दलाल, पोलीस अधीक्षक, सो. रायगड-अलिबाग यांचे हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत. गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरीकांकडुन खोपोली पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
      तसेच यापुर्वी देखील खोपोली पोलीस ठाणेकडे सन 2023 ते 2025 या सालात गहाळ झालेल्या एन्ड्रॉईड मोबाईल पैकी एकुण 110 मोबाईल सी.ई.आय.आर. या माध्यमातुन हस्तगत करण्यात आलेले असुन आजपावेतो एकुण 29,00,000/- रुपये किंमतीचे एकुण 158 एन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले असुन नागरीकांना परत देण्यात आलेले आहेत.
     सदरची कामगिरी ही रायगड जिल्हयाचे मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती आँचल दलाल, मा.अपर पोलीस अधीक्षक, श्री. अभिजीत शिवथरे, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक श्री. शितल राउत, पोशि/520 अमोल राठोड यांनी केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post