शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते - पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर

         
              शिवाजी पवार 
                   इंदापूर तालुका प्रतिनिधी 

           लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते - पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने अकलूज गोळीबार चौक येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिरात १८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी बोलताना धवलसिंह मोहिते- पाटील म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यामुळे आम्ही प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून आरोग्य विभागाला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी जनसेवा संघटनेचे सतीश पालकर, सुधीर रास्ते, अण्णासाहेब इनामदार, राजाभाऊ गुळवे, विठ्ठल इंगळे, बापू मगर, नवनाथ साठे, मयूर माने, ज्योती कुंभार, संजय गाडे, राहुल शहाणे, प्रताप कोकिळ, सागर साळुंखे, अरुण शहाणे, पिंटू वैद्य, शेखर शेंडे, अनिल सोनार, रघुनाथ साठे आदी उपस्थित होते.

           जुने पोलीस स्टेशन येथे जनसेवा कामगार संघटना शाखेचे उद्घाटन डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारत हणवते, आप्पा अवघडे, गोविंद पवार, रोहिदास हणवते, साधू खंडागळे, किशोर साठे, दत्ता काळोखे, अनिल बनपट्टे, दीपक लोंढे आदी उपस्थित होते.
           तसेच उपजिल्हा रुग्णालय येथे गरोदर महिलांना सुंठवडा-डिंकवडा चे वाटप करण्यात आले. तसेच सदभाऊ चौक येथे धवलसिंह रिक्षा स्टॉप यांच्यावतीने प्रतिमा पूजन करून जिलेबी व केळी वाटप करण्यात आले. यावेळी तात्या गुळवे, किशोर चव्हाण, गंगाधर माने साखळकर, रणजीत सुसलादे, चंद्रकांत कोळी, शिवदत्त नामदास, हतीशचंद्र पंडित, आसिफ काझी, नागेश सोनवणे, मच्छिंद्र पगारे, गौरव बाबर, महादेव जगताप, मनोहर कोळी, नितीन नाटेकर, देविदास जाधव, अभि भारती व जनसेवा संघटनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post