गणेश कांबळे
उपसंपादक महाराष्ट्र राज्य
राजगड पोलीस स्टेशन ने नागरिकांचा विश्वास जिंकणारी व कौतुकास्पद अशी कामगिरी बजावलेली आहे...
पोलिसांनी चालू वर्षात गहाळ झालेल्या एकूण ५६ मोबाईल फोन व एक सोन्याची अंगठी असा सुमारे ५.४८ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून मूळ मालकाच्या ताब्यात दिलेला आहे...
या पोलीस प्रशासनाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जनसामान्यांमधून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत असून, त्यांनी आभार सुद्धा व्यक्त केलेले आहे...
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तसेच पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या करण्यात आली...
ही कामगिरी सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलीस यंत्रणेबद्दलचा विश्वास अधिक रूढ करणारे ठरेल असं म्हणायला सुद्धा वावघ ठरणार नाही...
Post a Comment