शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पोस्को महाराष्ट्र स्टीलचा शैक्षणिक उपक्रम - आनंददायी शालेय साहित्य वाटप..



          
                  उत्तम  तांबे 
                          रायगड जिल्हा संपादक  

पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी मागील ३ वर्षापासून शालेय साहित्याचे वितरण करत आहे. आत्तापर्यंत एकूण ३,७११ शालेय साहित्य संच वितरीत केले आहेत. त्याचप्रमाणे यावर्षीही कंपनीने माणगांव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
या वर्षीच्या उपक्रमांतर्गत, पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने माणगांव तालुक्यातील ४१ शाळा तसेच इंदापूर, खरवली, गोरेगाव, नागाव आणि माणगांव भागातील सुमारे ५० दिव्यांग विद्यार्थ्यांना असे एकूण १,००० शालेय साहित्य संच वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना आवश्यक साहित्याची पूर्तता व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
वाटप केलेल्या शालेय साहित्यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले वह्या, १२ पेन्सिलचा सेट, पट्टी, खोडरबर, शार्पनर, रंगीत पेन्सिल, रंगीत खडू, चित्रकलेची वही, गोष्टींची पुस्तके इत्यादी साहित्य समाविष्ट होते. हे साहित्य विद्यार्थी आणि पालकांच्या प्रत्यक्ष गरजा ओळखून तयार करण्यात आले होते. शालेय साहित्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता, पोस्कोच्या या मदतीमुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या वर्षीच्या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच दिव्यांग विद्यार्थ्यांना या उपक्रमात समाविष्ट करण्यात आले. यामध्ये केवळ दिव्यांग विद्यार्थीच नव्हे, तर अनाथ, दिव्यांग आई-वडील असणाऱ्या आणि निराधार महिलांची मुले यांचाही समावेश होता. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात कंपनीने सहकार्याचे हात पुढे केल्याने त्यांचे पालक आणि शिक्षकांमध्ये समाधान आणि कृतज्ञतेची भावना दिसून आली.
या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी कंपनीच्या या कार्याचे कौतुक केले. शिक्षकांनी सांगितले, “आज बऱ्याच आदिवासीवाड्यावरील अनेक विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साहित्य घेण्याची पुरेशी साधने नाहीत. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागते, अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करता येते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो.”

पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने हा उपक्रम स्थानिक शाळांशी समन्वय साधून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवला. कंपनीच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांनीही यात सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हेच या उपक्रमाचे खरे यश होते.

कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, “शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा मूलभूत घटक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी भक्कम पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पोस्को सातत्याने प्रयत्नशील आहे. विशेषतः अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान वाढतो आणि त्यांना शिकण्यासाठी नवे बळ मिळते.”

पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी शिक्षण विषयात अनेक काम करत असते. यामध्ये जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती/ बांधकाम, विज्ञान प्रयोग संच वाटप, संगणक संच वाटप, ई-लर्निंग कीट, शैक्षणिक साहित्य वाटप, प्लास्टिक वापर जनजागृती आणि एकत्रीकरण, शाळेत जाण्यासाठी बस ची व्यवस्था इत्यादी उपक्रम राबवले जातात. कंपनी येत्या काळातही शिक्षणासोबतच आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि उपजीविकेसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post