शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

खासदार प्रणिती शिंदे यांचा तेलगाव,कुसूर गावभेट दौरा -- ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या.



      
  ‌.       
    मोहसीन आतार
   ‌.             सोलापूर शहर प्रतिनिधी

                       दिनांक, १० जुलै २०२५
              सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव, कुसूर या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात गावकऱ्यांनी त्यांच्या समस्या वडापूर बंधारा रस्ता दुरुस्ती करणे, अरळी बंधारा रस्ता दुरुस्ती करणे, अंत्रोळी कुसूर रस्ता, विंचूर कुसूर रस्ता, कुसूर सरहद्द रस्ता, क्रीडांगण, अंबाबाई मंदिर सभामंडप, बिरोबा मंदिर सभामंडप, गावातील अंतर्गत रस्ते, निराधार योजनेचे पैसे मिळत नसल्याबद्दल तक्रारी, रेशन दुकानाबद्दल तक्रारी, वीज वितरण बाबत तक्रारी, शाळेतील शिक्षकांबाबत तक्रारी, तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी अशा अनेक मुद्द्यांवर ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले.
यावेळी काही समस्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून जागेवरच सोडविल्या.
            यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले, आपण सर्वांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे. प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हीच माझी भूमिका आहे. आपण सांगितलेले सर्व कामे टप्प्याटप्याने पूर्ण करण्याचे अभिवचन दिले.
या गावभेट दौऱ्यात जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष धर्मराज पुजारी, श्रीशैल पाटील, मुकिंदा कोळी, पांडुरंग पुजारी, रमझान नदाफ, सिद्धाराम व्हनमाने, सुनंदा कोळी, श्रीमंत पुजारी, गणपती पुजारी, अल्लाउद्दीन मुल्ला, श्रीकांत चलवादी, महादेव तेली, श्रीकृष्ण पुजारी, दऱ्याप्पा शेजाळे, श्रीशैल कोळी, राजकुमार पुजारी, पुनर्शिद चलवदे, यल्लाप्पा माशाळे, आप्पासो वाघमारे, रहिमान शेख, उमेश हेरकर, अन्नप्पा सासणे, सिद्धाराम कोळी, नागू पाटील, देविदास कोळी, नानू शेख, पप्पू शेख, शिवम्मा कोळी, मुत्तण्णा कोळी, रहिमान शेख, मधू हक्के, नागनाथ पाटील, नागेश पाटील, नागनाथ बोलकवठे, मल्लिकार्जुन मासाळे, नबीलाल शेख, अप्पासाहेब बिरुनगी, मल्लिकार्जुन चणेगाव, काशिनाथ व्हनकडे यांच्यासह तेलगाव व कुसूर चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post