शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शहा ग्लोबल स्कूल येथे वन महोत्सव व डॉक्टर डे चे मोठ्या उतू आयोजन..



            शिवाजी पवार
                         इंदापूर प्रतिनिधी

             मानवी जीवनाची जपणूक तसेच वृक्षांचे संगोपन प्रत्येक व्यक्तीने तंतोतंत करावे. जेवढी जेवढी वृक्षांची लागवड महत्त्वाची. तेवढाच वृक्षांचा सांभाळ देखील गरजेचा आहे. हे तत्व पाळण्याची कृती इंदापूरचे शहा ग्लोबल स्कूल करत असल्याचे गौरवोद्गार काढून मुकुंद शहा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.इंदापूर शहरातील  शहा ग्लोबल स्कूल येथे वन महोत्सव व डॉक्टर डे साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने मुकुंद शहा बोलत होते.
 यावेळी कर्मयोगी  कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा, इंदापूर नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त माजी महिला नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशाली शहा, डॉ. संजय शहा, डॉ. चिंतामणी पाटील, डॉ.यतीन शिंदे, श्रीमती प्रतिमा शहा,डॉ. बिचकुले यांच्यासह पालक,विद्यार्थी,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 याप्रसंगी  मान्यवरांच्या हस्ते स्कूलच्या प्रणांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षाचे महत्व पटवून देणारे फलक घेऊन रॅली काढली.
संस्थेचे विश्वस्त अंगद शहा व रुचिरा शहा यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
          डॉ. क्षितिजा यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे व पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची झाडे लावली. आणि आपल्या परिसरातील झाडांची निगा राखण्याची शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली आणि विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजले. विद्यार्थी सोहम होळकुंदे याने वन महोत्सवा बाबत आपले मनोगत व्यक्त केले. नंदिनी रणदिवे आणि स्वराली शेंडे यांनी वनविषयक कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन शिक्षिका रितू शुक्ला यांनी केले व कार्तिकी पाटील यांनी आभार मानले.
         स्कूलमध्ये सात दिवस वन महोत्सव  शहा ग्लोबल स्कूल मध्ये एक जुलै ते सात जुलै दरम्यान शाळेमध्ये वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या काळात प्रत्येक वर्गाकडून झाडांचे व वनांचे आपल्या जीवनातील महत्त्व पटवून देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती संस्थेचे विश्वस्त अंगद शहा यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post