उरण रायगड उपसंपादक
संजय गायकवाड
परदेश प्रवासाची 25 वर्ष आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या परदेशातील प्रवासाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आज पर्यंत त्यांनी किमान अर्धे जग पालथे घातले सफाई कर्मचारी ते सर्व सामान्य सहकारी अशा किमान 400 सहकार्यांना त्यांनी परदेश पर्यटन घडवले त्यांनी कधीही पर्यटन तर कधी आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करताना तेथील बैठका आपल्या वक्तृत्वात आणि कर्तुत्वाने काढलेली छाप याची काही मंडळी साक्षीदार आहेत .
काही मान्यवरांचे परदेश पर्यटनाला अनुभव तसेच स्पर्धेत पर्यटनाची मुहूर्तमेढ होणारे शेकापचे जयंत पाटील आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे परदेशातील अनुभव वाचकांना निश्चितच भुरळ पाडणारे आहेत एकंदरीत च महेंद्र शेठ घरत यांच्या परदेश प्रवासाची सुरुवात प्रवासात घडलेल्या गमतीजमती वाचक आणि निश्चित मानसिक समाधान देतील कैलास मानसरोवर ही अतिशय कठीण आणि पवित्र समजली जाणारी यात्रा महेंद्र शेठ घरत यांनी संपत्नीक पूर्ण केली
त्याचे यथासांग वर्णन प्रदेश प्रवासाची 25 या मिनी कॅफीटेबल बुक मध्ये आहे त्याचे प्रकाशन शनिवारी दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि शेकापचे नेते जयंत पाटील हे प्रकाशन सोहळ्यानिमित्त एकच व्यासपीठावर येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि वित्त बातमी या दैनिकाचे संपादक मालक संदीप चव्हाण उपस्थित राहणार आहेत हा सोहळा उलवे नोड येथे शेलगर येथे सिद्धिविनायक बँकवेट हॉलमध्ये होणार आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थित होणारा हा सोहळा रसिकांसाठी एक मेजवान ठरेल त्यामुळे या प्रकाशन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी केला आहे.
Post a Comment