पेण | प्रतिनिधी – संजय गायकवाड, उरण रायगड उपसंपादक
पेण येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉयी पोस्टमन व एम.टी.एस. यांच्या विचारमंथन कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "पोस्टल कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी मी 1987 पासून सातत्याने लढा देत आलो आहे. त्यांच्या पाठीशी आजही ठामपणे उभा आहे आणि यापुढेही उभा राहणार आहे."
या कार्यक्रमात महेंद्र शेठ घरत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "पोस्टल, एसटी, जिल्हा परिषद, शिक्षक, आरोग्य कर्मचारी हे सर्वजण राज्य व देश पातळीवर निष्ठेने सेवा देतात. त्यांनी खेड्यापाड्यात खस्ता खाऊन आयुष्य घालवलं आहे. त्यामुळे त्यांच्या खाजगीकरणाचा प्रयत्न अन्यायकारक आहे आणि तो कदापिही सहन केला जाणार नाही."
मानवतावाद महत्त्वाचा – काँग्रेसमधील भूमिका स्पष्ट
महेंद्र शेठ घरत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "मानवतावाद हाच माझा खरा धर्म आहे, म्हणूनच मी काँग्रेसमध्ये आहे. सध्या विचारांची लढाई कमी झाली आहे आणि अहंकार वाढला आहे. पण आपण शिवरायांचे आदर्श समोर ठेवून जात-पात न पाहता एकत्र येण्याची गरज आहे."
राज्यभरातील ३६ जिल्ह्यांतील प्रतिनिधींची उपस्थिती
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून आलेले पोस्टल कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेंद्र शेठ घरत यांनी त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "कामगारांवर होणारा अन्याय मी कधीच सहन करणार नाही. कामगारांच्या हितासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन."
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर
कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्यात सुनील झुंजारराव, निसार मुजावर, टी. एन. रहाटे, संतोष कदम, अजय जाधव, मिलिंद थळे, गडगीळ गुरुजी, संतोष लाड यांचा समावेश होता. रायगड पोस्टल कामगारांच्या वतीने महेंद्र शेठ घरत यांचा सत्कार करण्यात आला.
कामगार चळवळीला बळ
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या युनियन प्रतिनिधींनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वामुळे आमच्या चळवळीला बळ मिळते आहे. पोस्टल कर्मचाऱ्यांच्या खाजगीकरणाविरोधातील लढ्यात ते ठामपणे आमच्यासोबत आहेत, हे आम्हाला मोठं आश्वासन आहे."
संपादन व प्रसिद्धी:
उरण रायगड उपसंपादक – संजय गायकवाड
Post a Comment