संजय गायकवाड
रायगड जिल्हा उपसंपादक
मुरुड रायगड
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी मुरुड पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ५५ लाख ७४ हजार रुपये किमतीचा चरस सदृश अमली पदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई ३१ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली होती की, काशीद समुद्रकिनारी एक संशयास्पद प्लास्टिकची गोणी आढळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी तपासणी केली असता, गोणीमध्ये चरस सदृश अमली पदार्थ सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून एकूण ११ किलो १४८ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला आहे, ज्याची अंदाजे किंमत ५५ लाख ७४ हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५०/२०२५ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(क), २२(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक सौ. आचल दलाल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (अलिबाग) सौ. प्रतीक्षा खेतमळीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्री. मिलिंद खोपडे, मुरुड पोलीस ठाण्याचे निरिक्षक श्री. परशुराम कांबळे, पोउनि. श्री. अविनाश पाटील, पोह. जनार्दन गदमले, पोह. हरी मेंगाळ, पोशी. मकरंद पाटील, पोशी. निखिल सुरते, पोशी. कैलास निमसे, पोशी. संतोष मराडे आणि पोशी. सुमित उकारडे यांनी सहभाग घेतला.
ही कारवाई मादक पदार्थ विरोधातील कारवायांमध्ये एक महत्त्वाची यशस्वी मोहीम ठरली आहे. पुढील तपास मुरुड पोलीस करीत आहे.
Post a Comment