शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे च्या जातीवादी उच्छादना विरोधात आंबेडकरी चळवळीने रणशिंग फुंकले


                      रणजित दुपारगोडे 
                            महाराष्ट्र प्रतिनिधी 

         पुणे  :   इंदापूर तालुक्याच्या इतिहासात कधी नव्हे इतका रोष आज उफाळून आला आहे. ३० ऑगस्ट २०२५ रोजी इंदापूर विश्रामगृहात झालेल्या आंबेडकरी चळवळीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचा जातीवादी मुखवटा फाडून काढण्यात आला.

        एनडीएमजेचे सचिव वैभव गीते यावेळी बोलताना म्हणाले “इंदापूर ही आंबेडकरी चळवळीची भूमी आहे. इथे जातीवाद्यांचे लाड, मस्तवलेल्या पोलीसांचे कारस्थान आणि गुन्हेगारीला दिलेले आश्रय यांचा आता  फडशा पाडला जाईल.”
     या बैठकीचे निमंत्रक ॲड. बापूसाहेब साबळे यांनी कोकणे यांना थेट उघडपणे आव्हान दिलं की 
पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे लावून त्यांना राजकारण व समाजकारणातून संपवण्याचा कारस्थानबाज कट हा कोकणे यांचाच आहे. तसेच 
इंदापूरात आल्या दिवसापासून बेकायदेशीर धंदे, गुन्हेगारी, जातीवादी छळ व दलित कार्यकर्त्यांवरील कारवाया यांना उघड पाठबळ देण्याचं काम कोकणे करीत आहेत. “हा पोलीस निरीक्षक हा कायद्याचा रखवालदार नसून जातीवादाचा दलाल आहे. याची तातडीने चौकशी व हकालपट्टी झालीच पाहिजे!”

         या बैठकीत तानाजी धोत्रे, शिवाजीराव मखरे, ॲड.राहूल मखरे, बाळासाहेब सरवदे, नितीन झेंडे, ॲड. कमलाकांत तोरणे, ॲड. पोळ, एम. बी. लोंढे, सूरज वनसाळे, सुनिल साबळे, निलेश खरात, प्रमोद चव्हाण, दत्तात्रय जगताप यांनी ज्वालाग्राही भाषणातून कोकणे यांचा पर्दाफाश केला.
         त्याचवेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांना निवेदन सादर करून, कोकणे यांच्या जातीवादी वादग्रस्त कारवायांची संपूर्ण माहिती देण्यात आली.
       संपूर्ण इंदापूर तालुका आता एकमुखाने विचारतोय – जातीवादाचा बाजार मांडणाऱ्या या कोकणे नावाच्या पोलीस निरीक्षकाला अजून किती दिवस आश्रय दिला जाणार ?
      कारण दलित कार्यकर्त्यांना छळणाऱ्या, गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या या अधिकाऱ्याचा ताबडतोब बदली व निलंबन हा एकमेव उपाय आहे.
       त्यामुळे जातीवादी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणेच्या विरोधात सध्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी रणसिंग फुंकल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post