शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

रखडलेला रस्ता पूर्णत्वासाठी महाविकास आघाडीकडून 'बेशरम लावा' आंदोलन......


मुखेड 
     मुखेड शहरातील बाराळी नाका परिसरात महामार्गावरील अर्धवट रस्ता पूर्ण करा या मागणीसाठी महाविकास आघाडी मुखेडच्या वतीने अनोखे 'बेशरम लगाव' आंदोलन करण्यात आले. 
मुखेड महाविकास आघाडी ( काँग्रेस,शिवसेना ऊ.बा.ठा,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ) कडून शहरातील बा ऱ्हाळी नाका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था होऊन नागरिक व वाहनधारकांना होणारा त्रास पाहता शासन व प्रशासनाच्या विरोधात राज्याचे सार्वजनिक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना तहसिलदार मुखेड मार्फत निवेदन सादर करून चौकात बेशरम झाडे लावा आंदोलन करण्यात आले.
      

2018 पासून चालू असलेल्या
नांदेड मुखेड बिदर महामार्गातील बाऱ्हाळी नाक्यावरील ( मुखेड - बाऱ्हाळी रोड )  व शहरातील काही भागात मुख्य रस्त्याने ( नर्सी - लातुर रोड ) या पुर्वी के.टी.कन्स्ट्रक्शनने कामे अर्धवट अवस्थेत सोडुन दिले. परत पुन्हा जोगदंड  कन्स्ट्रक्शनने सुद्धा कुणा मोठया बडया  व्यक्तीच्या सांगण्यावरून जाणीवपुर्वक जैसे थे ची परिस्थिती कायम ठेवल्यामुळे शहरातील या भागातील नागरीकांना, व्यापाऱ्यांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे म्हणुन चौकातील अर्धवट कामे  पुर्ण करण्यात यावीत यासाठी सा.बां.वि.मुखेड व संबंधीत वरीष्ठ कार्यालयाला काँग्रेसकडून वेळोवेळी लेखी व तोंडी सुचना देऊनही नागरीकांच्या जीवाशि व आरोग्याशी खेळण्याचा प्रकार दिसुन येत आहे. आजच्या "रस्ता दरबार" दिनी शासन व प्रशासनाला पुन्हा जागे करण्यासाठी मुखेडच्या महाविकास आघाडीकडून मुखेड - कंधार विधानसभेचे मा.आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव भारतयात्री डॉ.श्रावण रॅपणवाड,शिवसेना ऊ.बा.ठा.तालुकाप्रमुख उमेश पाटील आडलुरकर,काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,शिवसेनेचे शहरप्रमुख शंकरराव चिंतमवार,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुनिल मुक्कावार यांच्या नेतृत्वाखाली बाऱ्हाळी नाक्यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चौकात बेशरमाची झाडे लावून अनोखे आंदोलन महाविकास आघाडीने केले. 


    
प्रशासनाच्या गैरसोईच्या कारभाराबद्दल निषेध व्यक्त करून तात्काळ कार्यवाही न झाल्यास अजुन तिव्र आंदोलन करण्यात येईल असे आपल्या भाषणातून पदाधिकाऱ्यांनी  रोष व्यक्त केला. या आंदोलन प्रसंगी तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले,युवासेना शहरप्रमुख योगेश मामिलवाड,जिल्हा सेवादल उपाध्यक्ष विद्याधर अण्णा साखरे,अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष ईमराण पठाण,मागासवर्गीय सेल शहराध्यक्ष बालाजी साबणे,ओ.बी.सी.सेल शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड,युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष एम.आर. गोपणर,काँग्रेस उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड,सोशल मिडीया विभाग शहराध्यक्ष केतन मामडे,उद्योग सेल शहराध्यक्ष बाळासाहेब आकुलवाड,अल्पसंख्यांक सेल तालुका उपाध्यक्ष सय्यद,व्ही.आर.शेख,हाफीज पठाण, शिवसांब येरमुनवाड सह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.या निवेदनाच्या प्रति खा.प्रा.रविंद्रजी चव्हाण,मा.आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता नांदेड,बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, उपअभियंता बांधकाम विभाग मुखेड यांना देण्यात आलेल्या आहेत.
🌹गुलाब शेख 🌹
महाराष्ट्र पोलीस न्युज 24
महाराष्ट्र राज्य उपसंपादक 
===================

Post a Comment

Previous Post Next Post