शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मौजे कानगाव व पाटस येथे केंद्रीय कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाहणी...


                   नेताजी खराडे 
                            दौंड तालुका प्रतिनिधी 

        दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मौजे कानगाव व मौजे पाटस येथे केंद्र शासनाच्या कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला.

या प्रसंगी मा. अजितकुमार साहू, संयुक्त सचिव, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच मा. श्री. बिस्त, उपआयुक्त (कृषी) यांनी कानगाव येथील शेतकरी श्री. रामदास विजय रोडे यांना कृषी यांत्रिकीकरण उप अभियान (SMAM) सन 2025-26 अंतर्गत देण्यात आलेल्या कृषी औजारे बॅक स्थापना (CHC) घटकाची प्रत्यक्ष पाहणी केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्र पुरस्कृत योजनांची ग्रामीण स्तरावर होत असलेली प्रभावी अंमलबजावणी, प्रचार-प्रसार याबाबत समाधान व्यक्त केले. पुढेही अशाच पद्धतीने कार्य करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी श्री. रोडे यांनी अनुदानाच्या मर्यादेत वाढ करावी अशी मागणी केली असता, अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.
यानंतर मौजे पाटस (ता. दौंड) येथे शरदचंद्र दोशी कृषी सेवा केंद्राची तपासणी करून तेथील खते, कीटकनाशके व बियाणे साठा व पुरवठ्याची माहिती घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी खते, कीटकनाशके व बियाणे उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या.

या दौऱ्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अतिथींचे औक्षण करून स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मा. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. चौधरी, तालुका कृषी अधिकारी श्री. दुधाणे, मंडळ कृषी अधिकारी श्री. फडतरे, तसेच उपकृषी अधिकारी श्री. धेंडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश लोणकर, सहाय्यक कृषी अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती रेखा पिसाळ यांनी मानले.

 या पाहणी दौर्‍यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस नवे बळ मिळाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post