शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कानगांवमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 108 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा......

.                 नेताजी खराडे
                         दौंड तालुका प्रतिनिधी 

         पुणे : कानगांव│ देशातील अग्रगण्य व विश्वासार्ह सहकारी बँक म्हणून नावाजलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे हिच्या 108 व्या वर्धापन दिनाचा सोहळा कानगांव शाखेत मोठ्या उत्साहात पार पडला. शाखेमध्ये केक कापून हा दिवस विशेषरित्या साजरा करण्यात आला.

या प्रसंगी शाखा व्यवस्थापक प्रविण बाराते, विकास अधिकारी संदीप भागवत, कॅशियर पांडुरंग खळदकर, क्लार्क अक्षय जेधे, गणेश शितकल, नवनाथ आढागळे, विकास जगताप यांच्यासह कानगांवचे आजी-माजी पदाधिकारी, खातेदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे औचित्य साधून बँकेच्या स्थापनेपासून ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिक यांना दिलेल्या अर्थसहाय्याचा आढावा घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून, ग्रामीण विकासाचा कणा असल्याचे मत व्यक्त केले.

गावकऱ्यांनीही आपल्या अनुभवातून बँकेने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 108 वर्षांचा परंपरेचा वारसा पुढे नेताना बँकेने "विश्वास, प्रगती आणि सहकार्य" या ब्रीदवाक्याला अनुसरून आगामी काळात नवनवीन उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कानगांव शाखेत झालेल्या या वर्धापन दिन सोहळ्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Post a Comment

Previous Post Next Post