धनंजय काळे
प्रतिनिधी
माढा (जि. सोलापूर) :
तालुक्यातील रिधोरे गावाजवळील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. विशेषतः नदीपासून अवघ्या ४०० फुटांवर राहणारे रहिवासी श्री. महाबल पवन शिरढोणे (वय ४८) यांचे शेत व घर महापुराच्या पाण्याखाली गेले असून मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
महापुराचे पाणी घरात घुसल्यामुळे गृहउपयोगी वस्तू, घरगुती साहित्य, तसेच शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. गहू, ज्वारीसह पिकांचे मोठे नुकसान झाले असून जनावरांच्या चार्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांसाठी साठवलेले कडब्याचे गज वाहून गेले, मुरघासाच्या बँका, रासायनिक खताची पोती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.
शेतमालाबरोबरच घराचीही पडझड झाल्याने शिरढोणे कुटुंब संकटात सापडले आहे. या महापुरामुळे त्यांच्या जनावरांच्या चार्याचा व पिकांचा प्रश्न गंभीर बनला असून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.
Post a Comment