शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कर्मयोगी व नीरा भीमा कारखान्याच्या ऊस बिलांमुळे बाजारपेठांमध्ये उत्साह -इंदापूर तालुक्यातील चित्र



   
   शिवाजी पवार 
        इंदापूर तालुका प्रतिनिधी 
          
              पुणे :  इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखाना या २ कारखान्यांनी दिवाळीसाठी शेतकऱ्यांना दिलेली ऊस बिले व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना नियमित पगारासह दिलेला एक पगार बोनस, यामुळे इंदापूर शहरातील व तालुक्यातील गावागावांमधील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
               या दोन्ही कारखान्यांनी दिवाळीसाठी ऊस उत्पादन शेतकऱ्यांना प्रति टन रु. 100 प्रमाणे ऊस बिलाचे हप्ते अदा केले आहेत. त्यामुळे बाजारपेठांमधील खरेदीसाठी गर्दी वाढून कोट्यावधी रुपये बाजारपेठेत आल्याने, सध्या मोठ्या प्रमाणावरती आर्थिक उलाढाल सुरु आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांबरोबर व्यापारी वर्गातही उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याने गेली 37 वर्षे व निरा भीमा कारखान्याने गेली 25 वर्षे  दिवाळीसाठी ऊस उत्पादन शेतकऱ्यांना नियमितपणे ऊस बिले व कर्मचाऱ्यांना नियमित पगारांसह बोनस देण्याचे काम केले आहे. चालू वर्षी काही कारखान्यांनी दिवाळीसाठी शेतकऱ्यांना ऊस बिले काढलेली नाहीत, त्यामुळे कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा कारखान्याने दिवाळीला ऊस बिले अदा केल्याने शेतकरी, नागरिक, व्यापारी वर्गाला दिलासा मिळाल्याचे चित्र इंदापूर तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post