शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ग्रामपंचायत सातुर्ली येथे जयंती उत्साहात साजरी__


 भाऊ वैजल

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पालघर (मोखाडा) : मराठी शिक्षण प्रसारक समाज सुधारक स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज (दि.3) रोजी ग्रामपंचायत सातूर्ली येथे साजरी करण्यात आली.

          क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन सरपंच प्रमिला वांगड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गंगाराम वांगड, ग्रामपंचायत शिपाई नामदेव जाधव, ग्रामपंचायत लिपिक सदू वाजे, अंगणवाडी सेविका हिरा भवारी, अंगणवाडी मदतनीस शितल पाटील, ग्रामस्थ भगवान खोंडे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post