शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

चार दिवसाच्या नवजात बालिकेचे प्राण हडपसरच्या दामिनी मार्शलने वाचवले : परिसरात दामिनीचे कौतुक


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हडपसर) : दि ३१/१०/२०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता हडपसर पोलीस स्टेशन मधील दामिनी मार्शल व तुकाई मार्शल यांना कॉल द्वारे माहिती समजली.

         ससाणे नगर येथे दामिनी मार्शलची आवश्यकता आहे. असा फोन कॉल प्राप्त होताच दामिनी मार्शल व तुकाई मार्शल तत्काळ  ससानेनगर गल्ली नंबर १३ येथे पोहचले असता त्या ठिकाणी चार दिवसाची नवजात बालिका बेवारस स्थितीत आढळून आली. या घटनेची अधिक चौकशी केली असता गल्ली नं. १३ परिसरात चार दिवसाची बालिका कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सोडून गेले असल्याचे निष्पन्न झाले.

           हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी मार्शल महिला पोलीस अंमलदार वैशाली उदमले,  राजश्री जाधव, मंजुषा डेंगळे, उषा सोनकांबळे व तुकाई दर्शन मार्शल  पो. शि. पवार यांनी पाहिले त्या नवजात मुलीच्या चेहऱ्यावर मांजराच्या नखाच्या ओरखडे असलेल्या अवस्थेत  मुलगी  त्या ठिकाणी रडत होती.



          पथकाने तत्काळ नमूद नवजात बालीकेस ससाणे नगर येथील लहान मुलांचे डॉक्टर सचिन सानप यांच्याकडे घेवून जावून प्रथम प्राथमिक उपचार केला. तसेच सदर ची माहिती तात्काळ स्थानिक समाज सेवक आणि बाल कल्याण समितीस दिली. नवजात बालिकेला पुढील उपचारासाठी के. एम .हॉस्पिटल पुणे येथे हलवण्यात आले. पुढील देखभाली करिता काळजी व संरक्षण कामी बालकल्याण समिती क्रमांक १ येरवडा पुणे यांचे आदेशाने भारतीय समाजसेवा केंद्र कोरेगाव पार्क पुणे. यांच्या ताब्यात नवजात बालकास देण्यात आले आहे. 

           पोलिस शिपाई पवार यांनी स्त्री जातीचे अर्भक आई/वडील/पालक यांनी सोडून देण्याच्या उद्देशाने परित्याग केल्याने अज्ञात व्यक्तीनी विरुद्ध सरकार तर्फे फिर्याद दिली असून ठाणे अंमलदार पो उ नि विनोद पवार यांनी भा द वी कलम ३१७ प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास स पो नि अब्दागिरे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post