पंकज सरोदे
पुणे जिल्हा प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची एन्जीओप्लास्टी नुकतीच करण्यात आली. व तब्बल सहा दिवसांनी ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पुन्हा सक्रिय झाले आहेत..
आज दिनांक ०५-११-२०२४ रोजी जोशाबा समतापत्र वंचित बहुजन आघाडी जाहीरनामा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांच्या हस्ते एड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुणे येथे निवासस्थानी प्रकाशित करण्यात आला...
एससी, एसटी आरक्षणाच्या संदर्भातील वर्गीकरण आणि क्रिमीलेयर याला सर्वच राष्ट्रीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे 70-80 टक्के हा समूह वर्गीकरणाच्या आणि क्रिमीलेयरच्या विरोधात आहे. त्यांचा लढा वंचित बहुजन आघाडी लढत आहे. त्यामुळे हा वर्ग आमच्यासोबत येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
खुप छान व महत्वपूर्ण बातमी साहेब.. धन्यवाद...
ReplyDeletePost a Comment