शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शिवचरित्रकार हसन सय्यद यांना स्व. दादासाहेब रूपवते सन्मान पुरस्कार जाहीर

शिवचरित्रकार हसन सय्यद यांना स्व. दादासाहेब रूपवते सन्मान पुरस्कार जाहीर

अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आल्हाट

 संगमनेर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती व भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव निमित्त आद. दादासाहेब रूपवते जन्म शताब्दी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात समाजात आदर्शदायी आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजाभिमुख मान्यवरांचा स्व. दादासाहेब रूपवते सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.

     हा भव्य सोहळा महाराष्ट्र राज्याचे मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, मा. उत्कर्षाताई रूपवते, मा. आ. लहुजी कानडे, प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, मा. ॲड. संघराजजी रूपवते या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि. ११ एप्रिल, २०२५ रोजी दु. ०२:०० वा. मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड, संघ पेट्रोल पंपासमोर, संगमनेर येथे संपन्न होणार आहे.

       या सोहळ्यास महाराष्ट्रातील नावलौकिक असलेले व साहित्य, कला, लेखन, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. 
  
          तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते आणि विविध पुरस्काराने सन्मानित असणारे राहुरी तालुक्याचे भूमिपुत्र राष्ट्रीय समाज प्रबोधनकार हसन मासूम सय्यद यांची प्रबोधन क्षेत्रातील संघर्षमय घोडदौड पाहता व महाराष्ट्र आणि राज्याच्या बाहेरही शिवाजी महाराज व महापुरुषांचे कार्य तसेच प्रबोधनात्मक विचार ते समाजात अनेक वर्षापासून रुजवत आहेत. सोबतच गडकोट किल्ले भ्रमंती, शालेय विद्यार्थी तसेच अनेक लहान मुलांना शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची यशोगाथा त्यांच्या अनोख्या शैलीत सांगून, संस्कारक्षम पिढी घडवून सक्षम समाज निर्माण करण्याचे महान कार्य अनेक वर्षापासून अविरतपणे करत आहेत. त्यांचे हे कार्य लक्षात घेऊनच भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आणि स्व. दादासाहेब रूपवते जन्मशताब्दी सोहळा समितीच्या वतीने त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
           तरी याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post