आठ वर्ष्याच्या हरवलेल्या मुलीला अवघ्या दोन तासात बिबवेवाडी पोलिसांनी शोधले
महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे
आज रोजी सकाळी 07 वाजताच्या सुमारास मुलगी नामे दिव्या कमलाकर मासाळे वय 08 वर्षे ,(मतिमंद)रा. शेळके वस्ती हे त्यांचे नातेवाईकांच्या घरी आले असता, सदर मुलगी अचानक गायब झाल्याने व तिचा शोध घेऊन ती मिळून येत नसल्याने, तात्काळ कमलाकर मासाळ यांनी पोलीस ठाणे येथे कळविले असता, उपस्थित तपास पथक व दोन्ही बिट मार्शल व CR mobile यांनी अवघ्या दोन तासात मुलगी ज्या दिशेला गेलेले आहे. ते कॅमेरे बघून त्या भागात पेट्रोलिंग करून यशराज गार्डन या निर्जन स्थळी ती रडत असल्याचे दिसून आल्याने मुलीस ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप दिले. त्यावेळी उपस्थित आई-वडील व इतर लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहे. ( शंकर साळुंखे).
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन
Post a Comment