- उत्तम तांबे , रा .जी . संपादक
माणगाव -- बळीराजाचा मान , गावाचा अभिमान , शेताच्या बांधावर शेतकऱ्याचा सन्मान " अनेक वर्षाची परंपरा राखत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन माणगाव तालुका प्रेस क्लब तर्फे शेतकऱ्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातो . यावर्षीही 17 जुलै 2025 रोजी माणगाव तालुक्यातील माकटी येथील प्रगतशील शेतकरी - गणपत गोविंद मुरकर तसेच चाच निजामपूर येथील प्रगतशील शेतकरी - सहदेव सदू नाकते यांच्या शेताच्या बांधावर जाऊन माणगाव तालुका प्रेस क्लब तर्फे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला . या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यामुळे त्यांच्या कर्तुत्वाचा अभिमान म्हणून त्यांनी प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक केले आहे . हा सन्मान आपल्या शेती निष्ठेचा , आपल्या उपक्रमशीलतेचा आणि आपल्या सामाजिक जाणिवेचा सन्मान आहे . माकटी येथील गणपत गोविंद मुरकर हे वयाने 80 वर्षाचे शेतकरी असून आज तगायत शेतीमध्ये नांगर धरून शेती पीक घेत आहेत . शेतीबरोबर कडधान्य - भाजीपाला तसेच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आहेत तसेच चाच येथील शेतकरी - सहदेव सदू नाकते हे शेती व्यवसाय बरोबर फळभाज्या - कडधान्य काजू व आंबा झाडांची लागवड तसेच विशेष म्हणजे त्यांनी नवीन उपक्रम म्हणून खेकडा - चिंबोरी पालन शेती व्यवसाय सुरू केला आहे . यातून त्यांना आर्थिक फायदा मोठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले .अशा प्रगतशील शेतकऱ्यांना माणगाव तालुका प्रेस क्लब तर्फे सन्मानपूर्वक गौरविण्यात आले .
भारत हा कृषिप्रधान देश आहे . शेतकऱ्यांनी शेतीबरोबर विविध प्रकारचे कडधान्य , फळभाज्या , मत्स्य व्यवसाय तसेच बांबू लागवड करणे आवश्यक आहे . शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आहेत त्यांचा त्यांनी लाभ घेतला तर त्यांची खऱ्या अर्थाने आर्थिक उन्नती व प्रगती होईल . शेतकरी शेतीमध्ये जिवापाड मेहनत करून धान्य पिकवत असतो . उन्हाची आणि पावसाची तो तमा नं बाळगता सतत धडपडत काम करीत असतो .आपल्या मेहनतीने घामाने तो धान्य पिकवतो ' म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाते . अशा दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा माणगाव तालुका प्रेस क्लबच्या वतीने आज सन्मानपूर्वक सत्कार केला याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो .
असे माणगाव प्रांताधिकारी - डॉ . संदिपान सानप तसेच तालुका कृषी अधिकारी - किरण पडवळकर यांनी या प्रगतशील शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना आपले मनोगत व्यक्त केले . या गौरवशाली कार्यक्रमाला वनक्षेत्रपाल - प्रशांत शिंदे , ए .पी .आय . - नरेंद्र बेलदार ,कृषी सहाय्यक - प्रतीक बागडे , भुवन ग्रामपंचायत सरपंच - दीपक जाधव , इंदापूर माजी उपसरपंच - उदय अधिकारी , दानशूर - भावेश नाकते , राष्ट्रिय कॉग्रेस रायगड जील्हा उपाध्यक्षा - श्रद्धा जाधव , माणगाव तालुका प्रेस क्लब अध्यक्ष - संतोष सुतार , कार्याध्यक्ष - गौतम जाधव , उपाध्यक्ष - विश्वास गायकवाड , उपाध्यक्षा - आरती म्हामुनकर , सचिव - हरेश मोरे , खजिनदार - एस . वनारसे , प्रमुख सल्लागार - उत्तम तांबे , सल्लागार - विनोद सापळे , मुख्य संघटक - पद्माकर उभारे तसेचपोलीस वनविभाग व महसूल कर्मचारी या मान्यवरासमवेत माकटी व चाच गावचे ग्रामस्थ व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते .
Post a Comment